Raksha Bandhan | भारत माता की जय या जयघोषात पुण्याहून कश्मीरला जवानांसाठी राख्या रवाना
पुणे : Raksha Bandhan | आम्ही पुणेकर, केअर टेकर्स सोसायटी,कॅम्प एज्युकेशन सोसायटी, सायरस पूनावाला मुलांची शाळा व कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रक्षाबंधन बंधुता’ कार्यक्रमा अंतर्गत सीमेवरच्या सैनिक बांधवांसाठी पुण्याहून राख्यांचे पूजन करून राख्या सीमेवर तैनात सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या.
यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन वालचंद संचेती, आम्ही पुणेकरचे अध्यक्ष हेमंत जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल जाधव, ज्येष्ठ मूर्तिकार विवेक खटावकर, श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट चे सूरज परदेशी,सकल मराठाचे समाजाचे राजा चव्हाण, सोनिया इथापे, पुरातत्व विभाग, मुख्याध्यापक प्रशांत वाघ, समाजसेवक किशोर मेहता, ज्ञानेश्वर कांबळे, केअर टेकर्सचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या वतीने NCC च्या विद्यार्थ्यांनी बॅंड वाजवून उपस्थितांचे स्वागत केले. तर ‘रक्षाबंधन बंधुता’ उपक्रमाची सुरूवात सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल जाधव, राजश्री कुऱ्हाडे व चंदा जयस्वाल यांनी मराठा रेजिमेंटच्या सैनिक बांधवाना राखी बांधून केली. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी राख्या व ग्रिटींग कार्ड तयार करून सीमेवरील सैनिक बांधवांसाठी पाठवले आहेत. यामध्ये प्रशांत वाघ ,कन्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका लता सुधाकर भोसले, समाजसेविका सपना संतोष परदेशी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वालचंद संचेती म्हणाले, विद्यार्थ्यांना जवानांन बद्दलची आत्मियता निर्माण व्हावी आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढण्यासाठी असे उपक्रम प्रत्येक शाळेत झाले पाहिजेत. ‘रक्षाबंधन बंधुता’ या कार्यक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत होणार आहे.
सीमेवरील बांधवांसाठी पाठवण्यात आलेल्या राख्या भारत मातेचे जय घोष करीत,
जल्लोष पूर्ण वातावरणात रवाना करण्यात आल्या. पुणे, मुंबई,दमन, गांधीनगर, जोधपुर, जयपुर,
दिल्ली, पठाणकोट मार्गे जम्मू बेस कॅम्प ,उधमपुर कुपवाडा येथे रक्षाबंधनाच्या दिवशी पोहोचणार आहेत.
गाडीचे सारथ्य सागर बोदगिरे यांनी केले. यावेळी मूर्ती यांच्याकडून सैनिक बांधवांना रक्षा बंधन चॉकलेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन विजय कचरे सरांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय काका बेलिटकर,
रणजित परदेशी, अमोल अरगडे, ऍड. सुफियानजी शेख यांनी प्रयत्न केले.
केअर टेकर्स सोसायटी तर्फे संतोष फुटक यांनी आभार मानले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर