Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीला संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे एकत्र सामोरे जाणार? राजकीय हालचालींना वेग
सोलापूर : Maharashtra Assembly Election 2024 | एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीकडून सत्ता घेचून घेण्यासाठी महाविकास आघाडीने जोर लावला आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
वंचित (Vanchit Bahujan Aghadi-VBA), मनसे (MNS) यांनी आपली वेगळी चुल मांडली आहे. अशात आता छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू केली आहे. स्वराज्य पक्ष विधानसभा लढण्याच्या तयारीत आहे. त्याच वेळी मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे युती आणि आघाडीला राज्यात पर्याय मिळेल अशी रणनिती संभाजी राजेंनी आखली आहे.
स्वराज्य पक्षाचे नेते महादेव तळेकर यांनी आज भोसे येथे आयोजित केलेल्या महामंडळ महाएक्स्पो सोहळ्याच्या उदघाटनाला आले असता संभाजीराजे बोलत होते. यावेळी राजरत्न आंबेडकर हे देखील उपस्थित होते. मनोज जरांगे यांचा दृष्टिकोन आणि माझ उद्दिष्ट एक असल्याचे सांगत मनोज जरांगे, संभाजी राजे छत्रपती विधानसभेला एकत्र येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
आगामी निवडणुकीच्या संदर्भात मनोज जरांगे यांच्याशी आपण निश्चितच राजकीय चर्चा करू. त्यातून तिसरी आघाडी उघडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे संभाजी राजे म्हणाले. महाविकास आघाडी किंवा महायुती सोबत जाण्याचा प्रश्न नाही. आरक्षण देण्यापेक्षा ते आरक्षण कसं टिकेल यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे संभाजीराजे त्यांनी सांगितले.
यापूर्वी दोन वेळा आरक्षण मिळाले आहे मात्र टिकले नाही.
राज्यात मराठा ओबोसी समाजात वाद निर्माण होऊ नये यांची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असेही संभाजीराजे म्हणाले.
महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांवर रेटत आहे. आम्हाला हे वेड्यात काढत आहेत, फसवत आहेत.
हे सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. काल सरकारला दिलेल्या कालावधीचे दोन महिने झाले आहेत.
आता आम्हाला आरक्षणाची आशा सोडावी लागणार आता यांना आरक्षण द्यायचं नाही. फक्त आशेवर ठेवायचं आहे.
आता मराठ्यांनी ठरवलं आहे यांना खुर्ची ठेवायचं नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर