Kondhwa Pune Crime News | तब्बल 16 गुन्हे असलेला अट्टल चोरटा जेरबंद ! दुकानांचे शटर उचकटून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस, कोंढवा पोलिसांची कामगिरी
पुणे : Kondhwa Pune Crime News | रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर उचकटून आत शिरुन चोरी करणार्या सराईत गुन्हेगारांना पकडून कोंढवा पोलिसांनी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अमोल किसन अवचरे Amol Kisan Avachare (वय २७, रा. कासेवाडी) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. अमोल अवचरे याच्या विरुद्ध यापूर्वी कोंढवा पोलीस ठाणे २ (Kondhwa Police Station), खडक पोलीस ठाणे ४ (Khadak Police Station), लष्कर पोलीस ठाणे ३ (Lashkar Police Station), स्वारगेट पोलीस ठाणे ३ (Swargate Police Station), येरवडा (Yerawada Police Station), लोणीकंद (Lonikand Police Station), चंदननगर (Chandan Nagar Police Station), पिंपरी (Pimpri Police Station) येथे प्रत्येकी १ असे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत.
कोंढवा परिसरात वाढलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलीस तपास करीत असताना पोलीस अंमलदार संतोष बनसुडे व शाहिद शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंढव्यातील घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी अमोल अवचरे याने केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कासेवाडी परिसरात त्याचा शेध सुरु केला. तेव्हा अमोल अवचरे हा दुचाकीवरुन जाताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने तौसिफ शेख (रा. कोंढवा) तसेच यश गायकवाड (रा. कासेवाडी) यांच्या साथीने कोंढवा व सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शटर उचकटून चोरी केल्याचे मान्य केले. त्याच्याकडील दुचाकीमध्ये लोखंडी कोयता तसेच गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी १००ग्रॅम वजनाची श्रीकृष्णाची चांदीची मुर्ती त्यास सोनेरी पॉलिश केलेली तसेच १७ चांदीचे नग, ब्रेसलेट, सोन्याची वेढणी असा १ लाख १७ हजार ६०० रुपयांचा माल जप्त केला आहे. (Kondhwa Pune Crime News)
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त आर राजा (IPS R Raja),
सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे (ACP Dhanyakumar Godse),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर (Sr PI Vinay Patankar), पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील (Police Inspector Mansing Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे (PSI Balaji Digole), सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे,
हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, पोलीस अंमलदार गोरखनाथ चिनके, शाहीद शेख,
संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर