Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर

sri sri ravi shankar

ऑनलाइन टीम – Sri Sri Ravi Shankar | भारताचे सौंदर्य म्हणजे त्यातील विविधता. वेद म्हणतात, ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ – सर्व काही देवत्वाने भरलेले आहे. भारत स्वतःच अत्यंत वैविध्यपूर्ण संस्कृती, भाषा, वंश, धर्म, खाद्यपदार्थ आणि कला प्रकार असलेला एक खंड आहे, ज्याचे रंगरूप प्रत्येक शंभर किलोमीटरवर बदलते. इथले लोक त्याच्या विविधतेसोबतच प्रगतीपथावर राहिले आहेत आणि या देशाची भूमी नेहमीच समृद्ध होत राहिली आहे, उलटपक्षी इतर अनेक पूर्वीची राष्ट्रे ही विविधता टिकवू शकली नाहीत आणि त्यांचे विघटन झाले.

भारताला ७८ वर्षांपूर्वी राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण वैचारिक अभिव्यक्ती आणि उपासनेचे स्वातंत्र्य हे नेहमीच त्याच्या परंपरांचे अविभाज्य अंग राहिले आहे. ही जगातील सर्वात प्राचीन जीवित संस्कृती आहे, जिचे हृदय तरुण आणि चैतन्यशील आहे, जिथे वेदांचे शाश्वत ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानासह सहजपणे नांदते आहे. अनेक आव्हाने असूनही, सत्यमेव जयते (सत्याचा विजय) हे ब्रीदवाक्य अजूनही या देशाच्या मुळाशी कायम आहे आणि हा देश प्रगतीशील आणि समृद्ध जीवनाच्या मार्गावर पुढे जात आहे.

प्रत्येक भारतीयाला आपल्या सर्व मर्यादांपासून मुक्त होणे, आपली खरी क्षमता ओळखणे आणि आपले ध्येय साध्य करण्याच्या मार्गात येणारे अडथळे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताला पुढे नेण्यासाठी केवळ आर्थिक सक्षमीकरण पुरेसे नाही. वैयक्तिक सशक्तीकरण, शांतता, शिक्षण, कौशल्य विकास आणि समाजातील वाढत्या ताणतणावाचे प्रमाण नियंत्रित करणे, हे सर्व आपल्या आर्थिक प्रगतीइतकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपले जास्तीत जास्त लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत, मानसिकदृष्ट्या सतर्क आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनतील, आपल्या आत केंद्रित होतील, तेव्हा वैयक्तिक प्रगती आणि समृद्धी आपसूकच घडू लागेल. देशाला अशा क्रांतीची नि:संशय गरज आहे.

श्रीमंतांनी अधिक दयाळू होणे, गरीबांनी अधिक आत्मविश्वास मिळवणे आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करणे हे आपल्याला आवश्यक आहे. लोकांनी दोषी आणि पीडिततेच्या मानसिकतेपासून दूर जात स्वतःला सशक्त मनःस्थितीकडे नेणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी देशात अध्यात्मिक क्रांतीसोबतच मानवी मूल्यांचे पुनर्जागरण करणे आवश्यक आहे, त्याशिवाय प्रगती टिकवून ठेवणे जड जाईल, मग ती सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक प्रगती असो.

कोणताही समाज जोपर्यंत हिंसा आणि गुन्हेगारीशी झुंजत आहे तोपर्यंत तो सुसंस्कृत असल्याचा दावा करू शकत नाही. आपल्याला घरगुती आणि सामाजिक जीवनातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांना आळा घालावाच लागेल आणि हे केवळ आध्यात्मिक ज्ञानानेच शक्य आहे.

कोणीतरी तुम्हाला नोकरी देईल याची वाट पाहू नका. उद्योजकतेची ज्योत प्रज्वलित करा जेणेकरून आपण प्रत्येक गाव स्वावलंबी आणि प्रत्येक जिल्हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध करू शकू. आध्यात्मिक दृष्टीकोन आपल्या तरुण पिढीच्या उर्जेला मार्गदर्शन करेल. केवळ एक सर्वांगीण, सर्वसमावेशक दृष्टिकोनच आपल्या लोकांना खऱ्या प्रगतीकडे नेऊ शकतो.

त्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स आणि समाज यांना एकत्रितपणे पावले उचलावी लागतील.
आमच्या स्तरावर, आम्ही ग्रामीण समुदायांमध्ये तरुण नेते तयार करण्यासाठी कार्यक्रम चालवत आहोत,
जे आपल्या लोकांना विविधतेत सद्भाव, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि
पर्यावरणाची काळजी घेण्याबद्दल शिक्षित करण्याची जबाबदारी उचलतील. (Sri Sri Ravi Shankar)

आम्ही काश्मीर आणि ईशान्येकडील कट्टरतावादाच्या निर्मूलनाचे कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले आहेत,
ज्यामुळे पूर्वीच्या शस्त्र बाळगणाऱ्या तरुणांना मुख्य प्रवाहात सामील करण्यात मदत झाली आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने आतापर्यंत आठ कोटींहून अधिक झाडे लावली आहेत,
भारतभरातील ७० नद्या आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि कायाकल्प केला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी सक्रियपणे कार्य करते आणि
समाजाच्या मानसिक आरोग्याच्या उन्नतीसाठी अनेक प्रशिक्षित समुपदेशकांना प्रशिक्षण देते,
ज्याची आजच्या काळात नितांत गरज आहे.
स्थानिक पातळीवरील वाद मिटवण्यासाठी आम्ही स्वयंसेवी लवाद कक्ष स्थापन करण्याचे काम करत आहोत.

निरोगी, स्वावलंबी आणि आनंदी समाज निर्माण करण्यासाठी प्रतिभावान नेते तयार करणे हे आमचे ध्येय आहे.
या स्वातंत्र्यदिनी, मी तुम्हा सर्वांना या सामूहिक उपक्रमात हातभार लावण्याची विनंती करतो.
ध्यान, सेवा आणि आनंदाच्या मार्गावर आपण एकत्र पुढे जाऊ या.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed