Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’
पुणे : Sinhagad Road Flyover | सिंहगड रोडवरच्या उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा आज (दि.१५) अजित पवारांच्या हस्ते पार पडला. आजपासून हा नवा उड्डाणपूल प्रवासासाठी खुला झाला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आजचा दिवस आनंदाचा आहे, आज सिंहगड रोडवरील पुलाचे उद्घाटन होत आहे, ही पुणेकरांना भेट आहे. पुण्यात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला वाढणारी लोकसंख्या कारणीभूत आहे. आम्ही काम करत असताना पुणेकरांना वाहतूक कोंडीतून कशी सुटका करता येईल यासाठी प्रयत्न करीत असतो. (Sinhagad Road Flyover)
ते पुढे म्हणाले, राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली. या योजनेवरुन अनेकांनी टीका केली. पण योजनेला राज्यातील महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सध्याच्या घडीला १ कोटी ५६ लाख महिलांचे अर्ज दाखल झाले आहे. त्यापैकी काल ३५ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर आज आणि उद्या या दोन दिवसात किमान ५० लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे नियोजन आहे.
१७ तारखेपर्यंत सव्वा कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा होतील,
ही योजना पुढील काळात देखील चालू राहण्यासाठी नियोजन केले आहे.
त्यामुळे आमच्या सरकारच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ‘बोले तैसा चाले,
त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’ असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर