Crime Court News | लाच प्रकरणी महिला वनाधिकारी निर्दोष मुक्त
Crime Court News | तक्रारदार यांना जलसंपदा विभागाचा पाइपलाईन टाकायचे कंत्राट मिळाले होते. सदरील काम हे बारामती ते धोंडेवाडी दरम्यान करीत असताना सदरील पाइप लाइन ही वनविभागाच्या जागेमधून जात असताना कंत्राटदाराने वनविभागाची परवानगी न घेता खोदकाम केले होते त्यावेळेस ते काम बंद पाडून ट्रॅक्टर आणि इतर साहित्य जप्त केले होते. सदरील साहित्य सोडविण्यासाठी तक्रारदार कडे ८००००/- रुपये लाच मागण्यात आली होती.
या प्रकरणी तक्रारदार यांनी तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला वन अधिकारी गीता विशाल पवार (Geeta Vishal Pawar) यांना अटक केली होती. सदर गुन्ह्यामध्ये तपासपूर्ण होऊन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या कोर्टात दाखल करण्यात आली होती.
सरकार पक्षातर्फे या खटल्यामध्ये एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपितर्फे ऍड. प्रताप परदेशी (Adv Pratap Pardeshi) यांनी उलटतपास घेतला. तक्रार अर्जामध्ये आरोपीविरुद्ध तक्रार देण्यात आली नव्हती. तसेच आरोपी यांना जप्त केलेला मुद्देमाल परत देण्याचा अधिकार नव्हता म्हणून आरोपीने लाच मागायचा प्रश्न येत नाही फक्त सापळा यशस्वी करण्यासाठी आरोपीला खोट्या गुन्ह्यात अटकविण्यात आले आहे, या खटल्यामध्ये आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध नाही असा युक्तिवाद ऍड. प्रताप परदेशी यांनी केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. विशेष न्यायाधीश यांनी आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. या खटल्यामध्ये ऍड.प्रताप परदेशी यांना ऍड. प्रमोद धुळे आणि ऍड. महेश राजगुरू यांनी साह्य केले. (Crime Court News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा