Maharashtra Assembly Election 2024 | ‘मायक्रो लेव्हलला लोकांचे महायुतीवरील प्रेम कमी’ महायुतीच्या बैठकीत चर्चेचा सूर; ‘सोशल मीडिया आर्मीने फेक नरेटिव्हला उत्तर’

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची आढावा बैठक (Mahayuti’s Leaders Meeting) बुधवारी (दि.१४) पार पडली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रमुख नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असू नयेत, त्यांची तोंडे एकमेकांसमोर असायला हवीत, असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी दिला. राज्यातील सरकारला सव्वादोन वर्षे झाली तरीसुद्धा लोकांना महायुतीचे सरकार का हवे, हे सांगावे लागत आहे, हे योग्य नाही असेही पाटील म्हणाले.

मायक्रो लेव्हलला लोकांचे महायुतीवरील प्रेम कमी झाले आहे. आपल्या हातून घडलेल्या चुकांचा हा परिणाम आहे. महायुतीला काठावरील नव्हे तर घवघवीत यश हवे असल्याने त्यासाठी एकजूट हवी असा सल्ला आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik) यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्याच पुन्हा न करता एकमेकांशी समन्वय साधून काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

ठाण्यात बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वय मेळावा पार पडला. त्याला प्रमुख मार्गदर्शक, तसेच कोकण विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant), प्रसाद लाड (Prasad Lad), आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे (Aniket Tatkare), खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske), खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेत ठाणे, पालघर, कल्याण या तीन जागा निवडून आल्या, परंतु भिवंडीची जागा पडली. विधानसभा निवडणुकीत अशा चुका होता कामा नये, असा सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिला.

प्रसाद लाड म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्टपासून प्रचार यात्रेला सुरुवात होणार आहे.
ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून, पालघर नवी मुंबई अशी ही यात्रा जाईल.
‘एकजूट महाराष्ट्रासाठी, अभियान विकासासाठी, कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडिया आर्मी तयार करून त्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Assembly Election 2024)

उदय सामंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली होती.
कोकणात ७४ जागा असून, त्या सर्व महायुती लढणार आहे. महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्क्यांपेक्षा पुढे असेल, असा दावा त्यांनी केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर

You may have missed