Pune Crime Branch News | ड्रग्ज घेणारेही आता पोलिसांच्या रडारवर; 119 जणांची यादी गुन्हे शाखेकडे
पुणे : Pune Crime Branch News | अमली पदार्थाचे हब झालेल्या पुण्यात ड्रग्ज विकणार्या पेडलर्स पोलीस कारवाई करतात. परंतु, अमली पदार्थ घेणार्यांवर कारवाई केली जात नसल्याने ड्रग्जची मागणी कायम असते (Pune Drug Case). त्यामुळे अशा ड्रग्ज विक्री करणार्या पेडलर्सबरोबरच आता नशा करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पेडलर्सकडून मिळालेल्या त्यांच्या ग्राहकांची पोलिसांनी यादी केली आहे. गुन्हे शाखेने अशा ड्रग्ज विकत घेणार्या ११९ जणांची यादी तयार केली आहे. त्यांच्याकडे पोलीस चौकशी करणार आहे.
ललित पाटील ड्रग्ज रॅकेटमुळे पुण्याची देशभर बदनामी झाली. पोर्शे कार अपघात, FC रोडवरील पबमधील ड्रग्ज (L3 Bar Case Pune) सेवनाचा व्हिडिओ, टिंगरेनगरला सापडलेले १ कोटींचे एम डी अशामुळे पुणे शहर हे ड्रग्जचे हब झाल्याचे बोलले जाऊ लागले. ड्रग्जमुक्त पुणे या पुणे शहर पोलिसांच्या मोहिमेला त्यामुळे धक्का लागला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी अमली पदार्थ उत्पादनाचा साठा आणि त्याची साखळी तोडण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमली पदार्थांची विक्री करणार्यांबरोबरच त्याचे सेवन करणारे, विकत घेणारेही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. अशा ड्रग्जची विक्री करणार्या १० ते १५ जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून कोणकोण ड्रग्ज विकत घेतात, त्यांची यादी केली आहे. त्यांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. (Pune Crime Branch News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा