Bharat Flag Foundation Pune | भारत फ्लॅग फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनी उपक्रम; झेंडे पायदळी न जाऊ देण्यासाठी अभियान

Bharat Flag Foundation Pune

कलेक्शन बॉक्सेसचे मोफत वितरण

पुणे : Bharat Flag Foundation Pune | कागदी झेंडे १५ ऑगस्ट नंतर पायदळी न जाऊ देण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशन तर्फे अभियान आखण्यात आले आहे. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी झेंडे कलेक्शन बॉक्सेसचे व ध्वजनियमावलीचे मोफत वितरण करण्यात आले .भारत फ्लॅग फाउंडेशनचे हे २२ वे वर्ष असून झेंडे पायदळी न जाऊ देण्याचा उपक्रम यंदाही सुरू आहे, असे मुरुडकर यांनी सांगीतले. मोती चौक(बुधवार पेठ) येथील विद्याप्रसारिणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेत गिरीश मुरुडकर यांच्या उपस्थितीत विश्वस्त केशव कुलकर्णी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका मनीषा हवालदार, शिक्षक सुरवसे, वैशाली विसाळ, सुचित्रा पाटील, कसबे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना झेंडे कलेक्शन बॉक्स देण्यात आले आणि माहितीपत्रक देऊन जागृती करण्यात आली. यावेळी बोलताना गिरीश मुरुडकर यांनी शारीरिक फिटनेस राखण्याबाबत मुलांना प्रोत्साहित केले .जुनाट संकल्पना सोडून देशासाठी कणखर होण्याच्या त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून दाद मिळाली. मुलांना तिरंगी बॅच व खाऊचेही वाटप यावेळी करण्यात आले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर

You may have missed