Amol Balwadkar Independence Day Run | स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन”ला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद
अबाल वृद्धांनी लुटला आरोग्यदायी उपक्रमाचा आनंद
कोथरूड : Amol Balwadkar Independence Day Run | कोथरूडकरांचा स्वातंत्र्य दिन आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने अमोल बालवडकर फाउंडेशनने (Amol Balwadkar Foundation) गुरुवारी मॅरेथॅान स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कोथरूडकर (Kothrudkar) धावले. कोथरुड मतदार संघाबरोबरच पुणे शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुलांनी हजारोंच्या संख्येने यात सहभाग घेतला. (Kothrud Pune News)
कोथरुड येथील पंडीत फार्म (Pandit Farms Pune) येथे १५ ॲागस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फाऊंडेशन व ॲटेनेक्स फिटनेस (Atenx Fitness) यांच्या संयुक्त विद्यमानाने कोथरुड मतदार संघातील (Kothrud Assembly Constituency) नागरीकांकरीता “अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन 2.0” चे (Amol Balwadkar Independence Day Run 2.0) आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथरुड मतदार संघातील तसेच पुणे शहरातील युवक-युवती, ज्येष्ठ नागरीक, महिला, मुलांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या मॅरेथॅानमध्ये 3 किमी, 5 किमी व 10 किमीचे टप्पे ठेवण्यात आले होते.
विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरीकांकरीता आयोजित केलेल्या “वॅाकेथॅान”ला (Walkathon Event In Kothrud Pune) देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात आयोजित स्पर्धांना ज्येष्ठांनी आपला भरभरून प्रतिसाद दिला. सर्व सहभागी खेळाडुंना मेडल्स देवुन तसेच विजेत्यांना विविध बक्षिसे देवुन गौरवण्यात आले.
मॅरेथॉनच्या निमित्ताने नागरिक एकत्र यावेत. त्यातून त्यांच्यात संवाद घडावा आणि त्याचबरोबर नागरिकांचे आरोग्यही जपले जावे असा उद्देश या “अमोल बालवडकर इंडिपेंडेंस डे रन”चा होता. याला कोथरूडकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे युवकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. नागरिकांनी दिलेल्या या प्रतिसादाचे नक्कीच कौतुक आहे. आगामी काळातही अशाच विधायक उपक्रमांना आम्ही प्राधान्य देणार आहोत.
- अमोल बालवडकर (माजी नगरसेवक तथा संस्थापक अमोल बालवडकर फाउंडेशन)
- Amol Balwadkar (former Corporator And Founder Amol Balwadkar Foundation)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन