Hindu Janajagruti Samiti On Mahayuti Govt | हिंदुत्ववादी महायुती सरकारवर हिंदू जनजागृती समिती नाराज; देवस्थान जमिनीच्या निर्णयावर आक्रमक भूमिका

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar

मुंबई : Hindu Janajagruti Samiti On Mahayuti Govt | स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणार्‍या राज्यातील महायुती सरकारवर राज्यातील हिंदुत्ववादी संघटनाच नाराज असल्याचे दिसत आहे. देवस्थानांच्या जमिनीबाबत महायुती सरकारने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाला हिंदू जनजागृती समितीने कडाडून विरोध केला आहे. यामुळे राज्यात हिंदुत्ववादी सरकारविरोधात हिंदुत्ववादी संघटना असे चित्र दिसत आहे.

दरम्यान, देवस्थानांच्या जमिनीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्षांनी देखील संशय व्यक्त केला आहे. मंगळवारी मंत्रिमंडळाने हा वादग्रस्त निर्णय घेतला होता.

राज्य सरकारच्या निर्णयावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही टीका केली आहे. षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनीही या निर्णयावर टीका केली. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे सरकार देवस्थानच्या जमिनी काही लोकांच्या घशात घालू पाहत आहे, असा आरोप या नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, या संदर्भात हिंदू जनजागृती समितीच्या महाराष्ट्र मंदिर महासंघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयांशी विसंगती दर्शविणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देवस्थानची जमीन पुजारी किंवा भाडेकरूच्या नावावर करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे.

त्यामुळे देवस्थानच्या जमिनी इतर कुणालाही हस्तांतरीत करता येत नाहीत. देवस्थानच्या जमिनींचे रक्षण करण्याचे काम राज्य सरकारचे आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2007 साली घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा आहे, असे आमचे मत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक सुनील घनवट म्हणाले की, राज्य सरकारने घेतलेला निर्णय मंदिराच्या आर्थिक व्यवस्थापनावर परिणाम करणारा आहे. देवस्थानच्या जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. आता या जमिनी वर्ग एक मध्ये टाकल्यामुळे त्यावर कायमची मालकी मिळविणे सोपे जाणार आहे. रोगापेक्षा इलाज गंभीर अशी ही अवस्था आहे. (Hindu Janajagruti Samiti On Mahayuti Govt)

सरकारच्या निर्णयाचा परिणाम काय होणार…

  • या निर्णयामुळे आता देवस्थानच्या जमिनी सध्या ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना त्याच्यावर मालकी हक्क मिळणार आहे.
  • या निर्णयाचा परिणाम मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यात होणार आहे.
  • मराठवाड्यातील 42 हजार 710.31 हेक्टर जमीन ही अतियात अनुदान किंवा खिदमतमाश इनाम जमिनी (देवस्थानाच्या देखभालीसाठी दिलेल्या जमिनी) आहेत. तसेच 13 हजार 803.13 हेक्टर जमीन ही मदतमाश इनाम जमीनी आहेत.
    या जमिनी देवस्थानच्या कारभारासाठी देण्यात आल्या होत्या.
  • यापूर्वी या जमिनी वर्ग 2 मध्ये मोडत असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगी शिवाय या जमिनीच्या वापराचा
    किंवा हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेता येत नव्हता.
  • आता देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जमिनींचा निर्णय घेण्याचा अधिकार
    सध्या जमिनीचा ताबा असलेल्यांना घेता येणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

You may have missed