Pune Pimpri Chinchwad Crime News | गुंगीचे औषध बीपीच्या औषधात टाकून चालकाने मालकाला लुबाडले
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | ज्येष्ठ नागरिकाला बी पी शुगरच्या औषधामध्ये गुंगीचे औषध टाकून त्यांना बेशुद्ध करुन चालकाने त्यांच्या अंगावरील दागिने, घरातील मौल्यवान साहित्य असा ६ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना थेरगाव मधील स्विस काऊंट्री सोसायटीत (Swiss County Society Wakad) बुधवारी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत वासुदेव भालचंद्र आडवाणी (वय ६८, रा. स्विस काऊंट्री सोसायटी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक ऊर्फ समीर जमादार (वय ४२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव आडवाणी हे कापड व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे रफिक जमादार हा चालक म्हणून कामाला होता. फिर्यादी हे बुधवारी सकाळी बेडरुममध्ये होते. त्यावेळी रफिक याने त्यांना औषध दिले. हे पिल्यानंतर फिर्यादी यांना गुंगी आली. ते बेशुद्ध पडले. त्यानंतर रफिक याने त्यांच्या हातातील साडेतीन लाख रुपयांचे साडे चार तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, १ लाख ८० हजार रुपयांची अडीच तोळ्याची सोन्याची सोनसाखळी, १ लाख रुपयांचे चैनमधील गणपती, पाकिटातील ६ हजार रुपये रोख, गाडीची चावी, गाडीचे आर सी बुक, बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट कार्ड असा ६ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. काही तासांनी त्यांना शुद्ध आल्यावर अंगावरील दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु, गुंगीच्या औषधामुळे ते काही करु शकत नव्हते. पोलिसांना याची गुरुवारी रात्री उशिरा माहिती मिळाली. त्यानंतर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पोटे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन