Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
पुणे : Kondhwa Pune Crime News | मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अॅड. तौसिफ चाँद शेख (वय ३२, रा. एन आय बी एम रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अॅड. तौसिफ शेख हे आझाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षाचे पदाधिकारी आहेत.
सहदेव महंत रामगिरी महाराज (रा. सदगुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, सराला बेट, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन त्याचे चित्रिकरण तयार करुन जाणीवपूर्वक व हेतु पुररस्सरपणे समाजात तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडवून आणण्याच्या हेतूने बेकायदेशीरपणे राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्यांचे भाषण दंगली घडवून दहशत माजवण्याच्या हेतूने चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. कोंढवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १९२, १९६,१९७, २९९, ३०२, ३५३ (२), ३५६(२), ३५६(३) याखाली गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध
Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग
Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन