Maharashtra Assembly Election 2024 | आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार, महायुती की मविआ? ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Mahavikas-Aghadi-Vs-Mahayuti

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचे स्पष्ट झाले होते. विधानसभेला देखील महायुतीला (Mahayuti) फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळेच विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशावेळी, विधानसभा निवडणुकीबाबत ओपिनियन पोलची समोर आलेली माहिती मात्र आश्चर्यकारक आहे. या अंदाजामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

आज महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाल्यास कुणाची सत्ता येऊ शकते, याबाबत टाइम्स नाऊ
आणि मॅट्रिझ यांनी सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार विधानसभेला भाजपा पुन्हा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 40 ते 42 जागांवर अत्यंत चुरशीची लढत असल्याचेही या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोणाला किती जागा मिळू शकतात…

  • भाजपाला 95 ते 105 जागा
  • शिवसेना शिंदे गट 19 ते 24 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 7 ते 12 जागा
  • महायुतीला 121 ते 141 जागा मिळू शकतात
  • काँग्रेसला 42 ते 47 जागा
  • शिवसेना ठाकरे गटाला 26 ते 31 जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 23 ते 28 जागा
  • महाविकास आघाडीला 91 ते 106 जागा मिळू शकतात
  • अपक्ष आणि इतर पक्षांना 11 ते 16 जागा

आज विधानसभा निवडणूक झाल्यास मतांची टक्केवारी कशी असेल…

  • भाजपा 25.8 टक्के
  • शिवसेना शिंदे गट 14.2 टक्के
  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 5.2 टक्के
  • काँग्रेस 18.6 टक्के
  • शिवसेना ठाकरे गट 17.6 टक्के
  • शरद पवार गट 6.2 टक्के
  • अपक्ष आणि इतर पक्ष 12.4 टक्के

न्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन