Pune Crime News | मृत्यू काही सेकंदांवर…अन् जीव वाचला, आरपीएफ जवान माधुरी शेलार यांनी वाचवले धावत्या एक्स्प्रेसखाली जाणार्या वृद्धेला
पुणे – Pune Crime News | रेल्वे मुख्यालयात कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान माधुरी शेलार (Madhuri Shelar) आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हडपसरमधील मांजरी स्थानकावरून (Hadapsar Manjri Railway Station) निघाल्या होत्या, इतक्यात त्यांना प्लॅटफॉर्मवरून एक वृद्ध महिला धोकादायकरीत्या लक्ष न देता रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसली. यावेळी आरपीएफ जवान माधुरी शेलार यांनी प्रसंगावधान दाखवत वेगवान हालचाली करून या वृद्धेचा जीव वाचवला. त्यांच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्यावेळी ही वृद्ध महिला रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होती, त्यावेळी तिच्या मागून मेल एक्स्प्रेस यमराज येत होती. शेलार यांनी क्षणाचाही विचार न करता प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील डेमूमध्ये चढून 2 नंबर ट्रॅकवरील वृद्धेला पटकन डेमूमध्ये ओढले…आणि त्याचवेळी मेल एक्स्प्रेस धडधडत निघून गेली. वृद्धेचा मृत्यू अवघ्या काही सेकंदावर असताना शेलार यांनी तिचा जीव वाचवला.
रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला हेडकॉन्स्टेबल माधुरी शहाजी शेलार या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त कार्यालयात कार्यरत आहेत.
या धाडसी कामगिरीबाबत हेडकॉन्स्टेबल माधुरी शहाजी शेलार यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी मांजरीमध्ये राहते. मांजरी ते पुणे स्टेशन असा माझा रोजचा प्रवास असतो. सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. क्षणाचाही वेळ न घालवता मी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर उभ्या असलेल्या बारामती डेमू (क्र. 01526) मध्ये चढले आणि पलीकडील दरवाजात जाऊन, येथे बसलेल्यांना हटवून वृद्ध महिलेला वरती घेतले.
क्षणाचाही उशीर झाला असता, तर वृद्ध महिला मेल एक्स्प्रेसखाली आली असती. एक चांगले काम माझ्या हातून झाले, याचा मला अभिमान वाटतो, असे माधुरी शेलार म्हणाल्या. दरम्यान, या धाडसी कामगिरीबद्दल माधुरी शेलार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध