Ratnagiri Crime News | दुर्दैवी ! रक्षाबंधनाआधीच भावाने संपवले जीवन, आत्महत्येपूर्वी बहिणीला व्हिडीओ कॉल करून दिली माहिती
रत्नागिरी : Ratnagiri Crime News | रक्षाबंधन सण (Raksha Bandhan) अवघ्या काही तासांवर आला असतानाच भावाने रेल्वे पुलावरून उडी मारून रेल्वेखाली आत्महत्या (Suicide Case) केल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी येथे घडली आहे. विशेष म्हणजे या तरूणाने आत्महत्येपूर्वी घटनास्थळावरून बहिणीला व्हिडिओ कॉल करून आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याने थरारक पद्धतीने रेल्वेखाली जीव दिला.
ही घटना रत्नागिरी शहराजवळील टीआरपी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. सुरेंद्र राजेंद्र कीर (वय 38 रा. मुरुगवाडा-पेठकिल्ला रोड, रत्नागिरी) असे तरुणाचे नाव आहे. सुरेंद्रला दारूचे व्यसन होते.
सुरेंद्र राजेंद्र कीर गुरुवारी दुपारी शहराजवळील कुवारबाव येथील टीआरपीजवळच्या रेल्वे पुलावर गेला आणि तिथून त्याने बहिणीला मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला करून मी ट्रेनखाली आत्महत्या करत आहे, असे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याने पुलावरून रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली.
सुरेंद्रच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले होते. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक निखार्गे, हवालदार मंदार मोहिते, हवालदार रूपेश भिसे, हवालदार रोशन सुर्वे, अजय कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध