Pune Pimpri Chinchwad Crime News | वाईन शॉपमधील साडेपाच लाख रुपये घेऊन कामगाराचे पलायन
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | वाईन शॉपमध्ये जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी दिली असताना कामगार साडेपाच लाख रुपये घेऊन पळून गेला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत रितिक हरीश छाबडा (वय २१, रा. कस्तुरी एपीटोम सोसायटी, वाकड)यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश नरेशकुमार छाबरीया (वय २१, रा. त्र्यंबकेश्वर बिल्डिंग, इंद्रायणीनगर, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मोशी प्राधिकरणातील प्रिव्हिया मॉलमध्ये वाईन शॉप आहे. त्यांच्याकडे महेश छाबरीया हा कामाला आहे़ शुक्रवारी सकाळी वाईन शॉपमध्ये जमा झालेली ५ लाख ५३ हजार ६०० रुपयांची रोकड फिर्यादी यांनी महेश छाबरीया याच्याकडे बँकेत भरण्यासाठी दिली.
मोशी प्राधिकरण येथील आय सी आय सी आय बँकेत ही रक्कम भरण्यास सांगितले होते. महेश छाबरीया याने ही कॅश बँकेत न भरता तो पळून गेला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही महेश छाबरीया हा न आल्याने त्यांनी बँकेत चौकशी केल्यावर त्याला महेश याने बँकेतही पैसे जमा केले नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्रार दिली दिली असून पोलीस उपनिरीक्षक रणसौर तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध