Pune Pimpri Chinchwad Crime News | अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्याकडून अडीच लाखांचे मेफेड्रॉन जप्त; मुंबईतून आणले होते एम डी

Drugs

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मुंबईहून अंमली पदार्थ घेऊन बाणेरमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलीस दलातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले (Anti Narcotics Cell Pimpri). त्याच्याकडून २ लाख ७० हजार रुपयांचे २४ ग्रॅम मेफेड्रॉन (Mephedrone) व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

कमलेश भगवान सासणे Kamlesh Bhagwan Sasane (वय ३४, रा. बालेवाडी फाटा, बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ज्याच्याकडून ससाणे याने एम डी आणले होते, त्या नदीम शेख (रा. मुंबइृ) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमी मिळाली की, म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम रोडवर ऑर्चिड हॉटेलजवळ जण थांबला असून त्याच्याकडे अंमली पदार्थ आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन संशयास्पदरित्या थांबलेल्या कमलेश ससाणे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २४ ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला.

अधिक चौकशी करता त्याने मुंबईतील नदीम शेख याच्याकडून हे एम डी आणले असल्याचे सांगितले. अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक दळवी अधिक तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Anjali Damania On Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज मोठा गौप्यस्फोट! अंजली दमानिया म्हणाल्या – अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून?

Maharashtra Assembly Election 2024 | आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार, महायुती की मविआ? ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

You may have missed