Devendra Fadnavis | ‘लाडकी बहीण’वर टीका करणार्‍या विरोधकांना फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, नालायकांनो पंधराशे रुपयात…

Devendra Fadnavis

पिंपरी : Devendra Fadnavis | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या राज्यामध्ये चर्चेचा विषय आहे. मात्र, सत्ताधारी नेत्यांच्याच वक्तव्यामुळे ही योजना वादग्रस्त ठरू पहात आहे. रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी या योजनेवरून सरकारला धारेवर धरले आहे. मात्र, विरोधकांच्या टीकेवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला. आज पुण्यातील बालेवाडी येथे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक म्हणतात की पंधराशे रुपयात महिलांना विकत घेत आहेत. नालायकांनो, आई-बहिणीचे प्रेम कोणीही खरेदी करु शकत नाही. ही योजना माता-भगिनींचा प्रती कृतज्ञता आहे. त्यांचे प्रेम, साथ यामुळे आम्हाला यश मिळते. परंतु, जे लोक सोन्याचे चमचा घेऊन जन्माला आले. त्यांना पंधराशे रुपयांचे मोल समजू शकत नाही.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, परकीयांचे आक्रमण ज्यावेळी आमच्यावार होत होते,
त्यावेळी आई जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना निर्माण केली. मुलींसाठीची पहिली शाळा पुण्यात सुरु झाली. केवळ राजकारण नाही तर समाजकारण, परिवर्तनाची पुणे ही भूमी आहे. त्यामुळे पुण्यातून या योजनेचा शुभारंभ केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महायुतीचे सरकार देना बँक सरकार आहे. लेना वाले नाही.
मागच्या काळात वसुली करणारे सरकार होते. 1 कोटी 3 लाख महिलांच्या खात्यात
प्रत्येकी तीन हजार रुपये पोहोचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे एकत्रित पैसे दिले जातील.

ही खटाखट सारखी नव्हे, फटाफट योजना आहे. थेट खात्यांमध्ये पैसे जातात.
बहिणींना ओवाळणी द्यायची म्हटल्यावर सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. न्यायालयात गेले.
न्यायालयाने नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक अर्जावर पुरुष, दुचाकी, बगीच्याचे छायाचित्र वापरले.
अर्ज बाद होण्यासाठी कारस्थान केले. संकेतस्थळ बंद पडण्यासाठी डेटा टाकला,
असा आरोप फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महिलांचा विकास झाला तरच भारत पुढे जाईल.
महिला केंद्रीत योजना सुरु केल्या आहेत. लखपती, लेक लाडकी योजना सुरु केली.
अर्थव्यस्थेच्या मुख्य धारेत महिलांना भागीदारी मिळाली पाहिजे. महिलांना अर्थव्यस्थेच्या केंद्रात आणल्यास
राज्याची अर्थव्यवस्था वेगात वाढेल.

फडणवीस म्हणाले, पूर्वी सरकारी योजना दलालांची होत होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी डीबीटीची योजना सुरु केली आहे. आधार, बँक आणि मोबाईल या त्रिशुळमुळे थेट खात्यात पैसे पडले.
दलालांचा धंदा बंद केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Anjali Damania On Ajit Pawar | राज्याच्या राजकारणात आज मोठा गौप्यस्फोट! अंजली दमानिया
म्हणाल्या – अजित पवारांकडे इतका पैसा येतो कुठून?

Maharashtra Assembly Election 2024 | आज विधानसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकणार, महायुती की मविआ? ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Prithviraj Chavan On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या मागणीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘ती आमची प्राथमिकताच नाही!’

Kondhwa Pune Crime News | सहदेव महंत रामगिरी महाराजांविरोधात कोंढव्यात गुन्हा दाखल; दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

You may have missed