Vishrantwadi Pune Drug Case | विश्रांतवाडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सप्लायर आरोपीला गुजरातमधून अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
पुणे : Vishrantwadi Pune Drug Case | टिंगरेनगर (Tingre Nagar Pune) येथून १ कोटी रुपयांचे ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाने ((Anti Narcotics Cell Pune) एका आरोपीला गुजरात येथून अटक केली आहे. (Pune Crime Branch)
मोहम्मंद अस्लम मोहम्मंद ईस्माईल मर्चंट (वय ४८, रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. टिंगरेनगर येथे सापडलेले ड्रग्ज हे मोहम्मंद मर्चंट याने मुंबईतून पाठविले होते. पुणे पोलिसांनी ते पकडल्याचे समजल्यावर तो पसार झाला होता.
श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अबनावे यांना पकडून त्यांच्याकडून टिंगरेनगर येथे १ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त केले होते. निमिश अबनावे हा मुंबईहून हे ड्रग्ज घेऊन आला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने मर्चट याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यावरुन मर्चट याचा शोध सुरु करण्यात आला. तो गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील जंबुसर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे व त्यांचे पथक तातडीने गुजरातला रवाना झाले. त्यांनी मोहम्मंद मर्चंट याला अटक केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, नितेश जाधव, दया तेलंगे पाटील, अविनाश कोंडे यांनी केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध