Ajit Pawars Convoy- BJP Show Black Flags | अजित पवारांच्या ताफ्याला भाजपाकडून काळे झेंडे; भाजपच्या आशा बुचकेंचा निशाणा, म्हणाल्या – ‘आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला…’
जुन्नर : Ajit Pawars Convoy- BJP Show Black Flags | राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरु असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत (Junnar Assembly Constituency) पोहोचली असता महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र दिसून आले. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचे आशा बुचकेंनी सांगितले.
जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? या जुन्नर विधानसभेत नेमकं काय शिजतंय? असे प्रश्न बुचकेंनी उपस्थित करत अजित पवारांना धारेवर धरलं.
देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे. अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात. मात्र आम्ही हे कदापी सहन करणार नाही. असे म्हणत भाजपकडून विधानसभा लढायला इच्छुक असणाऱ्या आशा बुचकेंनी शड्डू ठोकला आहे.
शासकीय कार्यक्रमात इतर पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप करत आशा बुचकेंनी अजित पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले. यानंतर आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Ajit Pawars Convoy- BJP Show Black Flags)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा