Pune Crime News | पुणे: पोलिस हवालदाराचे रिव्हॉल्व्हर, मुलाने केले हवेत फायरिंग ! मोठ्या मुलाने काढला व्हिडिओ, तीन वर्षानंतर झाला व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलीस दलात (Pune Rural Police) कार्यरत असलेल्या हवालदाराच्या मुलाने वडिलांचे रिव्हॉल्व्हर घेऊन हवेत फायरिंग केले (Firing In Air). त्याचा मोठ्या मुलाने व्हिडिओ काढला. तीन वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार रमेश बाबुराव केकाण (Ramesh Baburao Kekan), पार्थ रमेश केकाण (Parth Ramesh Kekan) आणि अथर्व रमेश केकाण Atharva Ramesh Kakan (सर्व रा. इस्टेला सोसायटी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे (API Vikram Salunkhe) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchandnagar Police Station) फिर्याद दिली आहे. रमेश केकाण हे ग्रामीण पोलीस मुख्यालयात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. इंदापूर तालुक्यातील कळस (Kalas Indapur) येथे त्यांची सासुरवाडी आहे. ते सिताराम रामदास ओमासे या सासर्‍यांकडे आपल्या कुटुंबासह तीन वर्षापूर्वी आले होते.

त्यांच्याकडे अधिकृत परवाना असलेले रिव्हाल्व्हर आहे. त्यांनी अनधिकृतपणे परवाना अटी शर्तीचे उल्लंघन करुन आपला मुलगा पार्थ केकाण याच्या ताब्यात दिले. पार्थ याला रिव्हॉल्व्हर हाताळण्याचे कसलेही ज्ञान नसताना त्याने त्या रिव्हाल्व्हरमधून हवेत फायरिंग केले. या फायरिंगचा व्हिडिओ त्याचा मोठा भाऊ अथर्व याने पार्थ याच्या मोबाईलमध्ये काढला होता. त्यानंतर तीन वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ पार्थ केकाण याने आता सोशल मीडियावर अपलोड केला.
सोशल मीडियावरील हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांच्या लक्षात आले.
त्यांनी त्याचा शोध घेतला असता तो इंदापूर तालुक्यातील कळस गावात व्हिडिओ शुट केल्याचे व पोलीस हवालदारांच्या मुलांनी केल्याचे आढळून आले.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर तपास करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2024 | ‘आता बँकेला ३०० कोटी …’, अजित पवार गटातील आमदाराचे मोठे विधान; म्हणाले – ” नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो…”

Mahayuti Seat Sharing | जागावाटपाची चर्चा रखडल्याने अजित पवार गटात अस्वस्थता; शिंदे गटाइतक्याच जागा मिळण्याची अपेक्षा

You may have missed