Viman Nagar Pune Crime | विमानात सीटवरुन कडाक्याची भांडणे; महिलेने सुरक्षा रक्षक महिलेच्या हाताला घेतला चावा
पुणे : Viman Nagar Pune Crime | बसण्याच्या जागेवरुन एस टी बसमध्ये भांडणे होताना आजवर ऐकले होते. परंतु, आता विमानातही बसण्याच्या कारणावरुन भांडणे होऊ लागली. पुणे ते दिल्ली या विमानात एका कुटुंबाशी महिलेचा बसण्याच्या जागेवरुन भांडणे झाली. सीआयएसएफच्या (CISF Jawan) महिला कॉन्स्टेबल ही भांडणे सोडविण्यास गेल्या. तेव्हा या महिलेने त्यांनाही मारहाण करुन त्यांच्या हाताला चावा घेऊन जखमी केले.
याबाबत सीआयएसएफ पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका रेड्डी (वय २६) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरेखासिंग (वय ४४, रा. कुमार पिकाडेली सोसायटी, संतोषनगर, वाकड) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे विमानतळावरील (Pune Airport) पुणे ते दिल्ली (Pune To Delhi Flight) विमानामध्ये शनिवारी सकाळी पावणेआठ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे व दिल्ली या विमानातून अंवतिका बोरसे व अदित्य बोरसे हे प्रवास करीत होते. सुरेखासिंग हिचे त्यांच्याशी बसण्याच्या जागेवरुन भांडणे झाली. सुरेखासिंग हिने त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्याची माहिती मिळाल्यावर प्रियांका रेड्डी व त्यांची सहकारी सोनिका पाल या तिला समाजावून सांगत होत्या. तिने दोघींना हाताने मारहाण केली. प्रियांका यांच्या हाताला चावून दुखापत केली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Viman Nagar Pune Crime)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य