Maharashtra Rains | उघडीप दिल्यानंतर पावसाची पुन्हा जोरदार हजेरी; राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
पुणे : Maharashtra Rains | शहरात मागील आठवड्यापासून पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर काल शनिवारी (दि.१७) पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. राज्यात काही भागात जोरदार ते मध्यम सरी कोसळल्या, तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते. दिवसभर अनेक भागात उन्हाचा कडाका जाणवत होता. (Pune Rains)
हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज रविवारी (दि. १८) काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट असणार आहे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सोमवारी (दि. १९) काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवारी (दि. २०) जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहरात शनिवारी दिवसभर उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. तसे तर गेल्या आठवड्यापासूनच उष्णता जाणवत होती. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.अचानक आलेल्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पुढील दोन-तीन दिवस पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. २१ ऑगस्ट रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट असणार आहे. (Maharashtra Rains)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य