Ajit Pawar | अजित पवारांना पराभवाची धास्ती? जाहीर सभेत मतदारांना आवाहन करत म्हणाले – “विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका, आम्ही…”
मंचर : Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) सुरु आहे. दरम्यान मंचरमध्ये सभेत बोलताना अजित पवार यांनी मतदारांना आवाहन केले आहे. लोकसभेचा निकाल आम्ही स्वीकारला आहे. आम्ही यशाने हुरळून जात नाही तसेच अपयशाने नाउमेदही होत नाही.
आता विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका. आम्ही कामाची माणसे आहोत असे सांगत आंबेगाव शिरूर मतदारसंघाचा उमेदवार राज्यात एक नंबर मताधिक्याने निवडून आला पाहिजे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अजित पवार म्हणाले, आंबेगाव शिरूरची (Ambegaon – Shirur) जनता नशीबवान आहे. त्यांना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासारखे संयमी व अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. कर्तुत्ववान माणसे सारखी येत नाहीत. वळसे-पाटील यांनी आंबेगाव शिरूर मतदार संघाचा कायापालट केला आहे. आंबेगावचा विकास झाल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. वळसे पाटील चांगले सहकारी व उत्कृष्ट प्रशासक आहेत. (Ambegaon Assembly Election)
विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार असून येथील जागा एक नंबर मताधिक्याने निवडून आली पाहिजे असे सांगून ते पुढे म्हणाले, या मतदार संघाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचे काम वळसे-पाटील यांनी केले असूनही काही हौसे, नवसे, गवसे येऊन वल्गना, टीका करतात. मात्र आम्ही फक्त विकास कामावर बोलू. केवळ शिव्या शाप देऊन प्रश्न सुटणार नाही अथवा कायापालट होणार नाही.
रक्षाबंधन सणापूर्वी दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. महायुती सरकार शब्द पाळणारे असून आम्ही ही योजना बंद करणार नाही. योजना थांबवायची की चालवायची हे तुमच्या हातात आहे.
घड्याळ, धनुष्यबाण व कमळ यांना पाठिंबा दिला तर योजना चालू राहील.
दोन ते अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे.
योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना विरोधक चुनावी जुमला असल्याचा आरोप करत आहेत.
मात्र आम्ही माय-माऊलींना फसवणार नाही. तसेच फसवेगिरी करणार नाही.
अनेक सभा पाहिल्या मात्र एवढ्या प्रचंड संख्यने महिला आज पाहतो आहे.
आमच्यावर भावाच्या नात्याने महिलांनी विश्वास ठेवावा, असेही अजित पवार म्हणाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य