Maharashtra Assembly Election 2024 | लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर? राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणूक नेमकी कधी होणार? याबाबत उत्सुकता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. लोकसभेप्रमाणेच आता आगामी विधानसभेतही (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला होता, त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती तयारीने उतरत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी, प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर, म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे. या योजनेचे दोन हप्ते काही दिवसांपूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची अधिकाधिक मते मिळवायची असतील, तर योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
तसेच, या योजनेचे आणखी किमान दोन-तीन हप्ते तरी महिलांच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे. त्याआधीच आचारसंहिता लागू झाली तर मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे निवडणुकीची घोषणा विलंबाने केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अनेक महिलांनी योजनेत अर्ज केले असले तरी त्यापैकी अनेक अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
अपात्र अर्जांची छाननी करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. शिवाय, ही योजना व्यापक करण्यासाठी नवे अर्जही भरून घेतले जातील. या दोन्ही कामांसाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेची योग्य आणि लाभदायी अंमलबजावणी करण्यासाठी महायुतीला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे.
त्यामुळे डिसेंबर महिन्यात निवडणूक घ्यायची झाल्यास नियोजित वेळेत नवी विधानसभा
अस्तित्वात न आल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
यांनी महाराष्ट्रात गरज भासल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत दिले होते.
gram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य