Katraj Pune Crime News | माझ्याशी लग्न केले नाही तर ब्लेडने वार करून अॅसिड टाकतो; तरुणाने दिली तरुणीला धमकी, वडिलांना लाथाबुक्क्यांनी केली मारहाण
पुणे : Katraj Pune Crime News | मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने लग्नाची मागणी घातली. तिने लग्नास नकार दिल्याच्या रागातून तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तु जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या वडिलांचा पाय तोडून टाकतो, तुझ्यावर ब्लेडने वार करुन अॅसिड टाकतो, अशी धमकी तरुणाने दिली आहे.
याबाबत कात्रजमधील एका २१ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत शाम मिसाळ Aniket Shyam Misal (वय २८, रा. नवरंग सोसायटी, गुलाबनगर, धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी पासून आतापर्यंत होत होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि अनिकेत मिसाळ हे मित्र होते. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन अनिकेत याने लग्नाची मागणी घातली. या तरुणीने लग्नास नकार दिला. त्याचा राग मनात धरुन अनिकेत फिर्यादीच्या घरी गेला. तिच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘‘तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या वडिलांचा पाय तोडून टाकतो व तुझ्यावर ब्लेडने वार करुन अॅसिड टाकतो,’’ अशी धमकी दिली.
तसेच त्याने मोबाईलमध्ये दोघांचे काढलेले खासगी व अश्लिल फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी त्याचा फोन ब्लॉक केला असता त्याने स्रॅपचॅट व इन्ट्राग्राम या सोशल मीडिया अॅपवर
फिर्यादीचा पाठलाग करुन तिला शिवीगाळ केली. धमकीचे मॅसेज पाठवत आहे.
तसेच फिर्यादीचे नातेवाईकांना फोन करुन फिर्यादीबद्दल खोटी माहिती देऊन
फिर्यादीची बदनामी करीत आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य