Sharad Pawar On Ajit Pawar | ‘अजित पवारांना बारामतीतून लढण्यात रस नाही’, शरद पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाले – “जिथे अनुकूल वातावरण…”
बारामती: Sharad Pawar On Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी आपल्याला बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक (Baramati Assembly Constituency) लढवण्यात रस नसल्याचे सांगितले होते. हे सांगतानाच मुलगा जय पवार बाबतही त्यांनी सूचक विधान केले होते. “स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि पक्षाच्या संसदीय समितीचा निर्णय असेल तर जय यांना याठिकाणी उमेदवारी मिळू शकते”, असं अजित पवार यांनी म्हंटले होते. (Sharad Pawar On Ajit Pawar)
दरम्यान आज पुण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी सर्व भगिनींनी रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) शुभेच्छा दिल्या. बारामतीमधून निवडणूक लढवण्यात आता रस नसल्याचे अजित पवारांनी केलेले विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. त्याबाबत शरद पवारांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
“सार्वजनिक जीवनात किंवा राजकीय जीवनात निवडणुका लढवलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जिथे अनुकूल वातावरण असतं, तिथे त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात. पण आता यांच्या (अजित पवार) मनात नक्की काय आहे, हे मला माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या का हे मला माहिती नाही. निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायला हवा. आम्ही त्याबाबत काय बोलणार? १५ ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केले त्यात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही संकल्पना त्यांनी मांडली. याचा अर्थ एकाच वेळी सगळ्या निवडणुका व्हाव्यात याचा आग्रह पंतप्रधानांचा होता.
दुसऱ्याच दिवशी तीन राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या गेल्या.
याचा अर्थ पंतप्रधानांच्या म्हणण्याला आता फारसं काही महत्त्व द्यायचं कारण नाही.
कारण पंतप्रधान बोलतात एक आणि निर्णय दुसराच होतो याची प्रचिती आपल्याला आली”,
असा टोला शरद पवारांनी लगावला.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होणार्या निधी वाटपावर शरद पवारांनी भूमिका मांडली.
त्याबाबत ते पुढे म्हणाले, ” काल माझ्याकडे एका शिक्षण संस्थेची बैठक होती.
आज सकाळीही रयत शिक्षण संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची माझ्याबरोबर बैठक होती.
या सगळ्यांचं म्हणणं होतं की राज्य सरकारकडून येणाऱ्या स्कॉलरशिपच्या रक्कमा मोठ्या प्रमाणावर थकलेल्या आहेत.
राज्य सरकारच्या इतर अनेक योजना, छोट्या घटकांना दिलेल्या सुविधा यासाठी लागणाऱ्या रक्कमेची
तरतूद आज नाही. असे असताना आणखी नवीन आर्थिक बोजा वाढवायला नको.
शेवटी मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यावर भूमिका मांडतील”,असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य