Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला
खोपोली : Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीतच धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. कालच अजित पवार यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. अशातच रायगडमध्ये (Raigad) आता शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात कलगीतुरा रंगला असून राष्ट्रवादी काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी केली आहे. खोपोली (Khopoli) इथं आयोजित पक्ष प्रवेश मेळाव्यात ते बोलत होते. (Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar)
जर तुम्हाला आमच्या विरोधात लढायचे असेल तर जाहीरपणे लढा, पण महायुतीत राहून गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा थोरवे यांनी दिला आहे. दरम्यान आमदार थोरवे यांच्या या विधानामुळे कोकणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोप होत असल्याने महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये धुमशान सुरूच आहे. कर्जतच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावर टोकाची टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यांचं नेतृत्वच तसं विश्वासघातकी आहे असा घणाघात आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी ही घात करणारी पार्टी आहे हे मी जाहीरपणे सांगतो.
प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणे हेच त्यांचे काम आहे, जे आपण पाहतोय.
त्यांच नेतृत्वच विश्वासघातकी आहे, जिल्ह्याचे जे नेतृत्व लाभले आहे तेच विश्वासघातकी आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र थोरवे यांनी निशाणा साधला आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य