Super Blue Moon | आज रात्री चंद्र आवश्य निरखून पहा, असे नयनरम्य दृश्य 2024 मध्ये वारंवार पहायला नाही मिळणार
नवी दिल्ली : Super Blue Moon | घरी बसल्या-बसल्या एखादे नयनरम्य दृश्य पाहण्याची इच्छा असेल तर छतावर जा. आजपासून पुढील तीन रात्रींपर्यंत, चंद्राची चमक मनमोहक असणार आहे. नासानुसार, 19 ऑगस्टपासून जगातील अनेक भागात ’सुपर ब्लू मून’ दिसणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी भारतात सुपर ब्लू मून पाहण्याची आज संधी आहे. (Super Blue Moon)
एक पौर्णिमा किंवा एका हंगामात तिसर्या पौर्णिमेला सुपर ब्लू मून म्हटले जाते. सुपर ब्लू मून तेव्हा होतो, जेव्हा सुपरमून आणि ब्लू मूनचे चक्र एकत्र येते. या दरम्यान चंद्र, पृथ्वीच्या जवळ पोहोचण्याच्या 90 टक्केच्या आत असतो. सुपर ब्लू मून शब्द 1979 मध्ये रिचर्ड नोले नावाच्या ज्योतिषाने दिला होता. आपल्या नावाच्या उलट, सुपर ब्लू मून निळा दिसणार नाही. परंतु, अनेकदा आकाशात धुराची मात्रा जास्त असल्याने चंद्र निळा दिसतो.
सामान्य पौर्णिमेच्या तुलनेत सुपरमून 30 टक्के जास्त चमकदार आणि 14 टक्के पर्यंत मोठा असतो. या सुपर ब्लू मूनच्या दरम्यान, रविवारी चंद्राच्या 98 टक्के भागावर सूर्याचा प्रकाश असेल, जो हळुहळु सातत्याने 99 आणि 100 टक्के वाढेल. सुपरमूनच्या शेवटच्या टप्प्यात, चंद्र पृथ्वीपासून जवळपास 225,288 मैल दूर असेल. तो पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची आवश्यकता नाही. तुम्ही मोबाईल किंवा कॅमेर्याच्या मदतीने या दुर्मिळ दृश्याचे फोटोसुद्धा घेऊ शकता.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य