RBI Imposes Penalties On BOM | RBI ने या सरकारी बँकेला ठोठावला दंड, दोन NBFC ला (हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड, पूनावाला फिनकॉर्प) देखील नाही सोडले; जाणून घ्या का?

rbi

नवी दिल्ली : RBI Imposes Penalties On BOM | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले की, त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) ला केवायसीसह वेगवेगळ्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याने 1.27 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. केंद्रीय बँकेने वक्तव्यात म्हटले आहे की, त्यांनी 8 ऑगस्ट, 2024 च्या एका आदेशात बीओएमला 1.27 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. याशिवाय आरबीआयने दोन एनबीएफसीला दंड लावण्याची कारवाई केली आहे. (RBI Imposes Penalties On BOM)

बँक ऑफ महाराष्ट्रला हा दंड बँक कर्ज वितरणासाठी लोन सिस्टम, बँकांतील सायबर सुरक्षा संरचना आणि केवायसीबाबत आरबीआयच्या काही दिशानिर्देशांचे पालन न केल्याने लावला आहे. तसेच रिझर्व्ह बँकेने हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडला (Hinduja Leyland Finance) केवायसी दिशानिर्देश, 2016 च्या काही तरतुदींचे पालन न केल्याने 4.90 लाख रुपयांचा दंड केला आहे. केंद्रीय बँकेने पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडला (Poonawalla Fincorp) 10 लाख रुपयांचा दंड लावला आहे.

आरबीआयच्या वक्तव्यानुसार, ही कारवाई नियम पालनातील कमतरतांमुळे करण्यात आली आहे. याचा ग्राहकांच्या कोणत्याही व्यवहारांशी संबंध नाही. आरबीआयकडून विविध बँका आणि एनबीएफसीवर नियामकांचे पालन न केल्याने दंड लावला जातो. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने पब्लिक सेक्टरमधील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि प्रायव्हेट सेक्टरमधील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेला सुद्धा दंड लावला होता.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

Maharashtra Assembly Election 2024 | ‘आता बँकेला ३०० कोटी …’, अजित पवार गटातील आमदाराचे मोठे विधान; म्हणाले – ” नाईलाजाने अजित पवारांसोबत गेलो…”

You may have missed