FIR On MLA Sanjay Gaikwad | तलवारीने केक कापल्याप्रकरणी शिंदे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; पोलिसांनी दखल घेत केली कारवाई
बुलढाणा: FIR On MLA Sanjay Gaikwad | शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. वाढदिवसाला तलवारीने केक कापणं आणि तलवारीने इतरांना केक भरवणं त्यांच्या अंगाशी आलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यासह इतर तिघांवर मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. (FIR On MLA Sanjay Gaikwad)
गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या चिरंजीवांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजारो नागरिकांसमोर तलवारीने केक कापून सेलिब्रेशन केलं होतं. यावेळी, आपल्या पत्नीला व इतरांना त्यांनी चक्क तलवारीनेच केक भरवला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो घेत सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी.बी.महामुनी (Add SP B.B. Mahamuni) यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
आमदार गायकवाड यांच्या या कृत्यावर विरोधकांनी टीकेची झोड उडवल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आमदार संजय गायकवाड म्हणाले, तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवारीने केक कापतानाचा हेतू कुणाला इजा पोहचवण्याचा नाही. त्यामुळे यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. नेत्यांना तलवार देणं म्हणजे मर्दांगीचे प्रतीक आहे. पोलीस परेड वेळी सुद्धा तलवार दाखवतो, मग तो काय लोकांना धमकावतो का?
ऑलिंपिक मधील तलवार बाजीचां गेम सुद्धा बंद करणार का?
आमच्या पुर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, त्यामुळे आम्ही तलवार वापरणार. चुकीचा वापर केला असेल तर गुन्हा होऊ शकतो. मात्र, अशाप्रकारे तलवार दाखवणे म्हणजे गुन्हा नसल्याचा अजब दावा देखील आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य