Pune Pimpri Chinchwad News | चिंचवड येथील व्यावसायिकाला गौणखनिज प्रकरणी 9 कोटींहुन अधिकच्या दंडाची नोटीस

Fine Notice

चिंचवड: Pune Pimpri Chinchwad News | चिंचवड येथील सोनिगरा दि मार्क (Sonigara The Mark) या प्रकल्पाकरिता परवानगी पेक्षा जास्त अवैध गौणखनिज उत्खनन केल्या प्रकरणी ग्रो इंडिया रेसिडेन्सीचे (Grow India Residency) भागीदार जितेंद्र सोनिगरा (Jitendra Sonigara) यांना ९ कोटी ६७ लाख ७५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. हा दंड तत्काळ भरण्याचे आदेश पिंपरी- चिंचवडचे अपर तहसीलदार जयराज देशमुख (Jayraj Deshmukh) यांनी दिले आहेत.

तहसील कार्यालयाकडून ईटीएसद्वारे अचूक मोजणी करण्यात आली. त्यात कंपनीने १९ हजार ३६०.७६५ ब्रास बेकायदेशीरपणे माती, मुरूम असे गौणखनिज उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे.कंपनीच्या वतीने भागीदार जितेंद्र पनराज सोनिगरा (Jitendra Panraj Sonigara) आणि त्यांच्या भागीदारांमार्फत सोनिगरा द मार्क या प्रकल्पाचे काम सुरू आहे. (Pune Pimpri Chinchwad News)

प्रकल्पासाठी त्यांनी ३२ हजार ६२८. ३०० ब्रास उत्खनन केले आहे. यामधील २७६७.५३५ इतका ब्रास साठा करून ठेवला आहे. कंपनीने केवळ १० हजार ५०० ब्रासचा तात्पुरता गौणखनिज उत्खनन व वाहतूक करण्यासाठी परवाना घेतला होता. मात्र, त्यांनी परवानगीपेक्षा अधिक गौणखनिज उत्खनन केल्याच्या तक्रारींची अपर तहसीलदार देशमुख यांनी दखल घेत पाहणी केली.

याबाबत सुनावणी घेतली. पाच पट दंड आकारून ९ कोटी ३३ लाख १८ हजार ८८७ रूपये दंड आणि ३४ लाख ५६ हजार ४५९ रूपये रॉयल्टी असा ९ कोटी ६७ लाख ७५ हजार ३४६ रूपयांचा दंड ग्रो इंडिया रेसिडेन्सी प्रा.लि. तर्फे भागीदार जितेंद्र सोनिगरा व इतरांना आकारण्यात आला आहे. ही दंडाची रक्कम तत्काळ शासनाकडे जमा करावी, असे आदेशात म्हंटले आहे.

” २ कोटी रुपयांची रॉयल्टी भरली आहे. तक्रारदार पैसे मागत असून अधिकाऱ्यांनी दबावातून नोटीस दिली आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे “, अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक जितेंद्र सोनिगरा यांनी दिली आहे.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

You may have missed