Home Loan Tips | तुम्ही सुद्धा होम लोन घेतलंय का?… मग क्लोज करताना ही 2 कागदपत्रं घेण्यास विसरू नका, निष्काळजीपणा पडू शकतो महागात
नवी दिल्ली : Home Loan Tips | स्वत:चे घर घेण्यासाठी लोक आपण जमवलेल्या बचतीसह बँकेचे देखील कर्ज घेतात आणि कर्जाचे हप्ते सुद्धा भरतात. कर्ज घेताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते, परंतु जर तुमचे हप्ते पूर्ण झाले असतील किंवा तुम्ही लोन क्लोज करणार असाल तरी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे. बँकेचे सर्व कर्ज फेडल्यानंतर कोण-कोणती कागदपत्रे घेणे आवश्यक आहे, हे जाणून घेऊया.
संबंधित बँकेंकडून तुम्ही दोन महत्वाची कागदपत्रे घेणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे न घेतल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. यापैकी पहिले कागदपत्र आहे एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि दुसरे आहे एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट.
डॉक्युमेंट 1 – NOC
होम लोनची परतफेड केल्यानंतर बँकेकडून मिळणारे हे सर्टिफिकेट या गोष्टीचा पुरावा आहे की, तुम्ही बँकेचे सर्व कर्ज फेडले आहे आणि आता तुमच्यावर कोणतेही देणे बाकी नाही. बँकेकडून एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळण्याचा अर्थ आहे की, आता तुम्हाला बँकेला काहीही देणे नाही. एनओसी घेताना हे देखील तपासून घ्या की, या कागदपत्रात Loan Closer डेट, रजिस्ट्रीनुसार तुमचे नाव, बँक अकाउंट डिटेल्स, लोन संबंधी सर्व माहिती आणि प्रॉपर्टी डिटेल योग्य पद्धतीने भरलेले आहे अथवा नाही. एखाद्या माहितीत करेक्शन करायचे असेल तर बँक अधिकार्याला सांगून दुरूस्त करून घ्या.
डॉक्युमेंट 2 – Encumbrance Certificate
लोन क्लोज झाल्यानंतर एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट तुम्हाला रजिस्ट्रार ऑफिसमधून घ्यावे लागते.
या कागदपत्रातून हे स्पष्ट होते की या मालमत्तेवर आता कोणत्याही प्रकारचे देणे बाकी नाही.
ही दोन कागदपत्रे घेतल्या मालमत्तेवर तुमची मालकी शंभर टक्के राहील, आणि ती विकताना सुद्धा अडचण येणार नाही. बँक आणि रजिस्ट्रार ऑफिसमधून ही कागदपत्रे आवश्य घ्या.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य