Supriya Sule On Maharashtra Assembly Election 2024 | निवडणूक पुढे ढकलण्यावरून सुप्रिया सुळेंचा महायुतीवर निशाणा, म्हणाल्या – ” कितीही रडीचा डाव खेळला तरी निकाल…”
नाशिक: Supriya Sule On Maharashtra Assembly Election 2024 | महायुती सरकारच्या (Mahayuti Govt) ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) आगामी विधानसभा निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे. योजेनेचे आणखी किमान दोन-तीन हप्ते तरी महिलांच्या बँक खात्यात जमा होणे आवश्यक आहे. त्याआधीच आचारसंहिता लागू झाली तर मोठा खोळंबा होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीची घोषणा विलंबाने केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कितीही निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही. हा रडीचा डाव आहे. लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नाही तर यातच त्यांचे अपयश आहे. पैसे वाटप करून निवडणूक जिंकता येत नाही. हे सरकार किती निर्णय संविधान चौकटीच्या बाहेर जाऊन घेतेय.
सरकार आले नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल. जो उठतो आहे तो अशी धमकी देत आहे. एकतर त्यांचे सरकार येणार नाही आणि ही योजना बंद होणार नाही. कारण आमचे सरकार आल्यानंतर या योजनेत आम्ही आणखी सुधारणा आणणार आहोत. लाडकी बहीण योजना यांनी कधी आणली? लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आणली, लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, अजित पवारांना काळे झेंडे दाखवले तो त्यांच्या महायुतीतला अंतर्गत प्रश्न आहे. मला एका गोष्टीचे वाईट वाटते की, प्रत्येकाचा मान सन्मान केला पाहिजे. काळे झेंडे दाखवले गेल्याची घटना पाहून मला आश्चर्य वाटले. पण दुसऱ्याच्या घरात आपण कशाला पडायचे? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
