Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत तणाव! ‘महायुती फक्त भाजपची गरज नाही,आमचे नेतेही मनावर दगड ठेवून महायुतीत…’, भाजपचा निशाणा

Ramdas-Kadam

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणूका तोंडावर असताना महायुतीतील (Mahayuti) वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. महायुतीच्या पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) कुचकामी मंत्री आहेत, असा हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी (Ramdas Kadam) केली आहे. गेल्या १४ वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

समृद्धी महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही? असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली. या टीकेला आता भाजपाकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

भाजपच्या संयमाला दुबळेपणा समजू नका. महायुतीची गरज एकट्या भाजपला नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. दरेकर म्हणाले, रामदास कदम हे महायुती मधील ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांचे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलचे वक्तव्य अपरिपक्व म्हणावे लागेल. रामदास कदम यांना काही समस्या असेल तर चार भिंतीच्या आत ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडायला पाहिजे होती.

पण त्यांचा स्वभाव हा खळबळजनक बोलण्याचाच आहे. महायुतीचा धर्म हा पाळलाच गेला पाहिजे. अन्यथा आरे ला कारे आम्हालाही करता येते. महायुती फक्त भाजपची गरज नाही. आमचे कार्यकर्तेही मनावर दगड ठेवून महायुतीत लढत आहेत, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

You may have missed