Maharashtra Assembly Election 2024 | पुरंदर-हवेलीत इच्छुकांची उमेदवारीसाठी रस्सीखेच; पंचरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता

Vidhansabha

पुरंदर: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर पार पडेल अशी चर्चा आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. लोकसभेप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढत होणार आहे. मात्र जागावाटपावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

यावरूनच पुरंदर हवेली मतदारसंघात (Purandar Haveli Assembly) राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) असला तरी यंदाच्या निवडणुकीला राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) या मतदारसंघावर दावा करण्याच्या तयारीत असल्याने धुसफूस सुरु आहे.

पुरंदर-हवेलीमध्ये आघाडी आणि महायुतीत बिघाडी झाली, तर पंचरंगी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. बंडखोरीचे आव्हानही असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुरंदर-हवेलीमध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एकत्रित काम केले. पुरंदरमध्ये महाविकास आघाडीतून प्रबळ दावेदार काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) आहेत.

या वेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे (Sambhajirao Zende) यांनी पुरंदरवर दावा केल्यामुळे आमदार संजय जगताप यांची धाकधूक वाढली आहे. यामुळे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

झेंडे यांनी पुरंदर-हवेलीत गावभेट दौरे सुरू केले आहेत. मग किती दिवस दुसऱ्यांचा प्रचार करणार? असा प्रश्न उपस्थित करून ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या निर्णयावर झेंडे आले आहेत. सध्या झेंडे यांनी स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे.

हवेलीतील शिवसेना (उबाठा) गटाचे (Shivsena UBT) शंकर नाना हरपळे (Shankar Nana Harpale)
विधानसभा लढण्याच्या तयारीत आहे. आघाडीत काँग्रेस पक्षाला जागा सुटेल,
असा अंदाज वर्तविला जात आहे. पुरंदर-हवेलीत महायुतीत अनेक दिग्गज असल्याने मोठी
रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. महायुतीतून ही जागा शिवसेना शिंदे गटाची (Shivsena Shinde Group)
आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी गावभेट दौरा सुरु केला आहे.

महायुतीतील राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार अशोक टेकवडे,
भाजपचे पुरंदर-हवेली विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्याकडूनही उमेदवारीवर दावा
सांगण्याची शक्यता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे
यांचीही विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. जालिंदर कामठे हे सुद्धा
निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत, असे भाजपमधूनच चार जण इच्छुक आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वतंत्र निवडणूक लढवायची,
यादृष्टीने राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे कामाला लागले आहेत.
दुर्गाडे यांनी पुरंदर पूर्व भागात गावभेट दौरे सुरू केले आहेत. दुसरा युवा चेहरा दत्ता झुरंगे
हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्यानंतर झुरंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आमदार संजय जगताप यांचा विश्वास संपादित केला.

यानंतर ते पंचायत समिती सदस्य, नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजय जगताप यांच्याविरोधातच त्यांनी दंड थोपटल्याचे पाहावयास मिळते. महायुतीत शिवसेना शिंदे पक्षाला जागा सुटेल, असा अंदाज वर्तविला जात आहे

पुरंदर-हवेली विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लढवावी, यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पुरंदर-हवेलीतील शिष्टमंडळाने भेट घेत चर्चा केल्याची माहिती आहे.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी