Pune Crime News | पुण्यात 15 ऑगस्टच्या दिवशीच शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

minor-girl

पुणे: Pune Crime News | शहरातील भवानी पेठ (Bhavani Peth Pune) परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न (Molestation Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला आहे. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे तर आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. (Pune Crime News)

देवराज पदम आग्री Devraj Padam Agri (वय-१९) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) त्याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने याबाबत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील भवानी पेठ परिसरात हे नामांकित हायस्कूल आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी पीडित मुलगी शाळेतील दुसऱ्या मजल्यावर आपली स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृह जवळ थांबला होता.

पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला. यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत तेथून पळ काढला.

घरी गेल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन
गाठत तक्रार दिली. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात ७४, ७५ (१) (i) पोक्सो
८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला अटक
करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.

Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Maharashtra Politics | आधी भ्रष्टाचाराचे आरोप मग भाजपात प्रवेश; घोटाळ्याचे आरोप असलेल्या
नेत्यांमुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार?

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

You may have missed