Raj Thackeray On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणात राज ठाकरेंचा संताप; म्हणाले – “एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे…”

Raj-Thackeray

बदलापूर: Raj Thackeray On Badlapur School Girl Incident | बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आज नागरिकांचा उद्रेक झाला. याप्रकरणी संतप्त झालेल्या जमावाने ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला होता, त्या शाळेची तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करत ठिय्या मांडला आहे. (Raj Thackeray On Badlapur School Girl Incident)

शाळेत लहानग्या मुलींसोबत घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोलीस प्रशासनाला फटकारत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.

राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?” असा सवाल विचारत राज यांनी प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान ” माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे.
आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा
होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या “, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

“बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा आम्ही छडा लावणार आहोत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed