Mangaldas Bandal | मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक; घरात सापडले कोट्यावधींचं घबाड
पुणे : Mangaldas Bandal | बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॅड्रिंग) प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने मंगळवारी (दि.२०) छापे टाकले. ईडीने बांदल यांच्या निवासस्थानातून काही कागदपत्रे जप्त केली. तसेच बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली.
मंगळवारी ईडीच्या पथकाने बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापे टाकले होते. जवळपास १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना ताब्यात घेतले. पथकाला बांदल यांच्या घरात काही महत्त्वाचे कागदपत्रे तसेच ५ कोटी ६० लाखांची रोकड आढळून आली. तसेच १ कोटींची ४ घड्याळे आढळून आली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा ईडीने बांदल यांच्यावर अटकेची कारवाई केली. यापूर्वी बांदल यांच्याविरुद्ध प्राप्तीकर विभागाने कारवाई केली होती. (Mangaldas Bandal)
बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती.
बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद