Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

marhan

पुणे : Mundhwa Pune Crime News | रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रसंगी अपघातात त्यांचा मृत्यु होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच खड्ड्यात साठलेले पावसाचे पाणी एका कारचालकाला महागात पडले. मुंबईहून भावाला भेटण्यासाठी आलेल्या कारचे चाक रस्त्यावरील खड्ड्यातील साठलेल्या पाण्यातून गेले. हे पावसाचे पाणी अंगावर उडाल्याने दुचाकीवरील चौघांनी कारचालकाला बेदम मारहाण (Marhan) करुन जखमी केले.

याबाबत यश विजय मनवारी (वय २९, रा. विक्रोळी पश्चिम, मुंबई) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना मुंढवा केशवनगर (Keshav Nagar Mundhwa) येथील जनसेवा बँकेच्या (Janseva Bank Mundhwa) समोरील सार्वजनिक रोडवर सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश मनवानी हे भावाला भेटण्यासाठी मुंबईहून आले होते. कारने जात असताना रोडवरील खड्यात साठलेले पावसाचे पाणी हे रोडने जाणार्‍या मोटारसायकलस्वाराच्या अंगावर उडाले. त्यामुळे चिडलेल्या मोटारसायकलस्वाराने कारला थांबविण्यास भाग पाडले. मोटारसायकलस्वाराने तू अंगावर पाणी का उडवले. कार नीट चालवता येत नाही का, तुला दिसत नाही का असे बोलून शिवीगाळ करु लागला. त्याने फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन जवळच पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादी यांच्या पाठीवर, डाव्या पायाच्या पिंडरीवर, उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ व कमरेच्या उजव्या बाजूला काठीने मारुन जखमी केले. त्यांच्या कारच्या उजव्या बाजूच्या पुढील दरवाज्यावर काठीने मारुन ते चेंबून दरवाजाचे नुकसान केले. पाठीमागे बसलेल्याने फिर्यादीस पुन्हा शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन त्यांच्या बाजूला रोडवर थांबलेल्या दोघांनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक उगले तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?