Badlapur School Girl Incident | ‘कोणत्या आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली?’, मुख्यमंत्री शिंदेंच्या दाव्यावर विरोधकांचा सवाल; केलेले वक्तव्य शिंदेंच्या अंगलट?
मुंबई : Badlapur School Girl Incident | बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मंगळवारी (दि. २० ऑगस्ट) बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन झाले. ज्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
तसेच या प्रकरणावर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणात कारवाईला कोणतीही दिरंगाई न करता आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रत्नागिरीतील चंपक मैदानावर लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
दोन तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका महिला अत्याचार प्रकरणात दोन महिन्यात आरोपीला फाशी देण्यात आली, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मिडिया हँडलवर यासंदर्भात पोस्ट देखील केली होती.
त्यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट केली आहे. आता यावरून राजकारण तापलं आहे. कोणत्या प्रकरणात आणि कोणत्या आरोपीला दोन महिन्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली हे मुख्यमंत्री आणि सरकारने सांगावं असं आव्हान विरोधकांनी केलं आहे. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे घेरले जाण्याची शक्यता आहे.
“शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा,
इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यात फाशी झाली? त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी.
हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्तएसआयटीची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का, कारवाई होते का?
मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत.
मुख्यमंत्री महोदय, बलात्कार सारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय तरी घेऊन नका”,
असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. (Badlapur School Girl Incident)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे