Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फाशीच्या शिक्षेचा उल्लेख केलेला खटला समोर; विरोधकांना प्रत्युत्तर
मुंबई : Eknath Shinde | रत्नागिरीच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली असे विधान केले होते. या विधानानंतर विरोधकांकडून मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधण्यात आला. महायुती सरकारच्या काळात कोणत्या आरोपीला फाशी दिली हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे असं आव्हान विरोधकांनी केले होते.
त्याला आता शिवसेना शिंदे गटाने एक्स या समाजमाध्यमवरून प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांच्या याच आरोपांवर शिवसेना शिंदे गटाकडून खुलासा करत त्या खटल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये ,आमच्या भगिनींच्या अंगावर हात टाकणाऱ्या, लहान मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या कुणालाही अभय मिळणार नाही. त्यांना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यासाठी रत्नागिरीच्या सभेत बोलताना न्यायालयाच्या एका आदेशाचा दाखलाही दिला. मात्र सभोवतालची, न्यायालयीन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसणारे विरोधक त्याचेही भांडवल करत आहेत. फाशीची शिक्षा झालेलीच नाही असं फेक नॅरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे. (Eknath Shinde)
मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला प्रकार मावळमध्ये घडलेला आहे. ६ वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या एका संतापजनक प्रकरणात फास्ट ट्रॅकवर न्याय देण्यात आला. याचा घटनाक्रम खालील प्रमाणे,
गुन्ह्याची तारीख – ०२/०८/२०२२
एफआयआर दाखल करण्यात आलेली तारीख – ०२/०८/२०२२
गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली तारीख – ०३/०८/२०२२
आरोप पत्र दाखल करण्यात आलेली तारीख – १२/०९/२०२२
तपास पूर्ण – एफआयआर दाखल झाल्यानंतर ४० दिवसात
आरोपपत्र दाखल करण्यात आले – १६ / ३ / २०२३ ( ६ महिन्यांत)
आरोपनिश्चिती झाल्यानंतर दोन महिन्यात साक्षी पुराव्यांची तपासणी सुरू – १२ / ०५ / २०२३
निर्णयाची तारीख – २२ /०३ / २०२४
जलदगतीने चालवण्यात आलेल्या खटल्यात आरोपी तेजस दळवीला चार महिन्यांपूर्वी पुणे न्यायालयाने फाशी सुनावली आहे.
महायुती सरकारच्या काळात गुन्हेगाराला अभय नाही.
आमच्या बहिणी लाडक्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेशी तडजोड कदापि मान्य होणार नाही.
अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही म्हणजे नाहीच. विरोधकांनी दुर्दैवी प्रकरणाचे राजकारण करणे थांबवावे.
न्यायासाठी पाठीशी उभे राहावे. राजकारण होतच राहील, असा टोलाही शिवसेना शिंदे गटाने विरोधकांना लगावला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे