Jayant Patil On Eknath Shinde | एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा घेतल्याने दोघांचे फारसे चालत नाही; जयंत पाटलांचा टोला

Jayant Patil eknath shinde

ऑनलाइन टीम – Jayant Patil On Eknath Shinde | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात म्हटले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इतर दोघांच्या तुलनेत बरीच मजल मारली आहे. त्यांनी दोघांनाही मागे टाकले आहे. शिंदेंनी दिल्लीचा कब्जा घेतल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कार्यकर्त्यांना हे समजून चुकले आहे. त्यामुळे परिस्थिती हळूहळू बदलत आहे. महायुतीत (Mahayuti) लवकरच मोठा धमाका होणार असल्याचे संकेत पाटील यांनी दिले आहेत.

भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडलेले नेते समरजित घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांची भेट घेण्यासाठी पाटील शुक्रवारी कोल्हापुरात (Kolhapur News) दाखल झाले तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना सत्ताधारी आपल्या बाजूने येण्यासाठी दबाव टाकतात. कारखानदारांची कर्जप्रकरण असतील तर ती थांबवली जातात. पक्षपातीपणा करत सरकार काम करत आहे. सरकारच्या पैशावर लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) काढली, त्याचा इवेंट केला जात आहे. पण राज्यात महिला, लहान मुली सुरक्षित नाही. असं असेल तर दुसरी कोणतीही मदत उपयोगाची नाही.

जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न

पाटील यांनी सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जास्त आमदार कसे निवडून येतील या साठी प्रयत्न सुरू आहे. महायुतीतील आणखीन बरेच नेते संपर्कात आहेत. ते हळूहळू समोर येईल. आताच त्याबाबत बोलणे योग्य होणार नाही.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव