Pune News | आजाद समाज पक्षाचा सर्वधर्म समभाव महामोर्चा यशस्वी; हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला, 300 फूट लांबीचा भारतीय ध्वज घेऊन महामोर्चा पार पडला (Video)
पुणे : Pune News | आजाद समाज पक्षाचा सर्वधर्म समभाव महामोर्चा अत्यंत यशस्वी ठरला असून, हजारो लोक रस्त्यावर उतरले. रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी जमलेल्या या मोर्चाने सरकार आणि पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. (Pune News)
सदरील महामोर्चात 300 फूट लांबीचा भारतीय ध्वज अभिमानाने फडकवण्यात आला, तसेच हा ध्वज घेऊन मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कॅम्प ते कलेक्टर ऑफिस पर्यंत निघाला.
आजाद समाज पक्षाच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात सर्व धर्म, जाती आणि समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रामगिरी महाराज यांनी इस्लाम आणि हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक वक्तव्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता, कारण त्यांना सरकारकडून, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठराखण केली होती. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
आम्ही सरकारला आवाहन करतो की तात्काळ रामगिरी महाराज यांच्यावर कठोर कारवाई
करून त्यांना अटक करण्यात यावी, अन्यथा आजाद समाज पक्ष पुढील आंदोलनाची दिशा ठरवेल.
मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला, परंतु समाजातील वाढत्या असंतोषाचे गांभीर्य लक्षात
घेऊन सरकारने तत्काळ कारवाई करावी.
मोर्चाच्या यशाबद्दल आणि सर्व सहभागींच्या योगदानाबद्दल आजाद समाज पक्ष त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा