Hadapsar Pune Crime News | तृतीयपंथींना मारहाण करणार्या तिघांना अटक; हांडेवाडी रोडवर रात्री झाली होती घटना
पुणे : Hadapsar Pune Crime News | हांडेवाडी रोडवर (Handewadi Road) रात्रीच्या वेळी थांबलेल्या तृतीयपंथींना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) तिघांना अटक केली आहे.
सचिन बनसोडे (वय ३४), महेश बनसोडे (वय २३) आणि अदित्य गायकवाड (वय २०, तिघे रा. पाण्याच्या टाकीजवळ, देवाची उरुळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत गंगानगरमध्ये राहणार्या एका २४ वर्षाच्या तृतीयपंथीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मंतरवाडी कात्रज रोडवरील (Katraj-Mantarwadi Bypass) हांडेवाडी येथील ग्रीन हॉटेलसमोर २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे साथीदार ग्रीन हिल हॉटेलबाहेर रोडवर थांबले होते.
त्यावेळी सचिन बनसोडे, महेश बनसोडे, आदित्य गायकवाड व एक जण तेथे आले.
फिर्यादी यांनी त्यांना तेथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ केली.
फिर्यादी या त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी फिर्यादीचे साथीदारांना हाताने मारहाण केली.
तसेच सचिन याने तेथे पडलेला प्लायवूडचा तुकडा उचलून फिर्यादीच्या तोंडावर,
पाठीवर मारुन जखमी केले.
अदित्य याने फिर्यादीच्या एका साथीदाराला कमरेचा बेल्ट काढून मारहाण केली.
फिर्यादीच्या तोंडातून रक्त आलेले पाहून चौघे जण पळून गेले. पोलिासंनी तिघांना अटक केली
असून पोलीस नाईक कांबळे तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा