Dheeraj Ghate On Mahavikas Aghadi | बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे महाविकास आघाडीला शोभत नाही – धीरज घाटे

Pune BJP

पुणे : Dheeraj Ghate On Mahavikas Aghadi | बदलापूरमधील दुर्दैवी घटनेनंतर (Badlapur School Girl Incident) त्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधकांकडून सुरू आहे. त्याचा शनिवारी पुणे शहर भारतीय जनता पार्टीकडून (Pune BJP) निषेध करण्यात आला. त्यानिमित्त काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. या प्रकरणात राज्यातील महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) संवेदनशील आहे. संबंधित आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टाकडून लवकरच शिक्षा सुनावली जाईल. पण अशा पद्धतीने संवेदनशील प्रकरणात राजकारण करण्याचा प्रयत्न करणे निषेधार्ह आणि महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही. त्यामुळेच आम्ही सर्वांनी याचा निषेध करतो असे शहराध्यक्ष धीरज घाटे या वेळी बोलताना म्हणाले.

महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), प्रत्येकाच्या पूर्ण नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करणे, मुलींसाठी मोफत शिक्षण, असे महत्त्वाचे निर्णय घेतले असून, महिला सबलीकरणासाठी सरकार कायम अग्रेसर असल्याचे सिद्ध झाले आहे असे प्रतिपादन घाटे यांनी केले.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, पुणे शहर सरचिटणीस रवि साळेगावकर, पुनीत जोशी, वर्षा तापकीर, गायत्री खडके, प्रियांका शेंडगे, अजय खेडेकर, सुनील पांडे, भावना शेळके, प्राजक्ता गांगे, दीपक पोटे, पुष्कर तुळजापूरकर, इम्तियाज मोमीन, सुरज दुबे, शैलेश बडदे, गणेश बगाडे, अरुण राजवाडे, अतुल साळवे, गिरीश खत्री, आशिष कांटे, किरण ओरसे, आप्पा घनवट, प्रतिक देसरडा, राकेश बनसोड यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव

You may have missed