Pune Crime Court News | कोंढवा: 1 कोटी 16 लाखांच्या फसवणूक प्रकरणी TikTok मौलाना ऊर्फ अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

TikTok Maulana

पुणे : Pune Crime Court News | साद मोटर्स या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ९ जणांनी तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूकीच्या प्रकरणात (Cheating Fraud Case) कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी TikTok स्टार मौलाना ऊर्फ अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान याचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर (Judge K.P. Nandedkar) यांनी हा निर्णय दिला आहे.

आरोपी हा त्यांच्या चॅनेल व इतर सोशल आणि डिजिटल मीडियामार्फत गुंतवणुकदारांनी गुंतवणुक करावी, यासठी ब्रेन वॉशिंग करतो. या गुन्ह्यातील तो मुख्य आरोपी आहे. जर त्यांना जामीन मंजूर केला तर यातून मिळवलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावू शकतो. गुंतवणुकदारांच्या पैशांतून खरेदी केलेली वाहने अद्याप जप्त करायची आहे. त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडीत चौकशी होणे गरजेचे असल्याने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

याबाबत निसार बाबुलाल शेख (वय ५५, रा. चिंतामणीनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक कलंदर खान Rafiq Qalandar Khan (वय ४४), सनोबर ऊर्फ सौदा रफिक खान Sanobar alias Sauda Rafiq Khan (वय ४०), इसा रफिक खान Isa Rafiq Khan (वय २३), मौलाना उर्फ अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान Abdul Rasheed Alias Miftahi Qalandar Khan (वय ४८, सर्व रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून आजपर्यंत घडला आहे.

आरोपींनी फिर्यादी यांना साद मोटर्स नावाच्या गाड्यांचे खरेदी विक्री व्यवसायात पैसे गुंतविल्यास दर महा २ ते ३ टक्के परतावा देतो, असे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी व अनिकेत गायकवाड, हमीद बाबुलाल शेख, जुलेखा समीर शेख, अझीम राजूभाई मुलानी, संदीप बधे, जहांगीर पठाण, विशाल चव्हाण, समीर रज्जाक शेख यांनी तब्बल १ कोटी १६ लाख ९३ हजार ५०० रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर गेल्या चार वर्षात आरोपींनी परतावा तसेच मुद्दलही परत दिली नाही.

आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जाची अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
आरोपीचा साद मोटर्स किंवा त्याच्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही, असा युक्तीवाद करण्यात आला.
सहायक सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी या जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले
की, साद मोटर्सकडून आरोपीला मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले आहेत.
आरोपीला जामीन दिल्यास तो इतर आरोपींना मदत करेल. परदेशात पळून जाण्याची शक्यता आहे.

साद मोटर्सच्या व्यवसयात आरोपी अर्जदार आणि सहआरोपी व्यक्ती हे कुटुंबातील सदस्य आहेत.
त्यामुळे आरोपीचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यवहारांशी कोणताही संबंध नाही हे मान्य करता येणार नाही.
कथित गुन्ह्याचे गंभीर स्वरुप लक्षात घेता आरोपीची कोठडीत चौकशी करणे
अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. (Pune Crime Court News)

या प्रकरणात सरकारी वकील ॲड. मारुती वाडेकर (Adv Maruti Wadekar) आणि फिर्यादीचे वकील ॲड अमेय सिरसीकर (Adv. Amey Sirsikar) यांनी काम पाहिले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव

You may have missed