BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

मुंबई : BJP On Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीला मोठा फटका बसल्यानंतर भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे जाताना जुन्या पद्धतीला खो देत नवीन रणनीती आखली आहे. टूलकिट हा त्यातील कळीचा मुद्दा आहे. देशाच्या विविध भागातील नेत्यांना प्रचारासाठी राज्यात उतरवले जाणार आहे.
यामध्ये विधानसभा फोकस न करता पंचायत समिती सर्कल फोकस करून प्रचारयंत्रणा, फोकसयंत्रणा, संपर्कयंत्रणा राबवली जाणार आहे. अनुभवी व्यक्तींना अधिकाची जबाबदारी देण्यात येणार आहे. नेत्यांपेक्षा कार्यकर्ता हा बेस असेल अशी रणनीती आखल्याची माहिती आहे. विविध राज्यांमधील नेत्यांना निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारकार्यात शेवटच्या वीस दिवसात उतरविले जात असे.
दिवस कमी असल्याने पक्षाची स्थानिक यंत्रणा आणि हे बाहेरून आलेले नेते यांच्यात समन्वय स्थापित होणे कठीण जायचे. या उलट बरेचदा वादही होत असत. हे लक्षात आल्यानंतर अन्य राज्यातील मोठ्या नेत्यांना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीसाठी उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात एक बैठक झाली.
केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मध्य प्रदेशचे प्रभावी नेते कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, विश्वास नारंग, खा. फग्गनसिंह कुलस्ते तसेच तेथील पक्षाचे संघटन मंत्री हितानंद शर्मा, तेलंगणाचे संघटन मंत्री चंद्रशेखर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीममधील ऋत्विक मेहता आणि विदर्भातील आठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सोमवारी एक महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे. प्रत्येक विभागात अन्य राज्यांतील नेते (प्रवासी नेते) उतरविले जातील.
आतापर्यंत निवडणुकीत भाजपच्या दृष्टीने बूथप्रमुख हा महत्त्वाचा घटक असायचा. बूथ प्रमुखांची रचना कायम ठेवली जाणार असली तरी त्याला समांतर एक वेगळी रचना आता करण्यात आली आहे. (BJP On Maharashtra Assembly Election 2024)
- राजकीय समज एकदम पक्की असलेल्या १५ जणांची एक टीम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार केली जात आहे.
त्यात निवडणुका जिंकण्याचा, लढण्याचा अनुभव असलेले स्थानिक नेते आणि इतर जाणकार प्रमुख कार्यकर्ते,
नेते असतील. हे टूलकिट क्रमांक एक असेल. या १५ जणांपैकी प्रत्येक जण ३०० जणांची टीम तयार करेल, हे टूलकिट क्रमांक २ असेल. - हे ३०० जण मग प्रत्येकी १५० या प्रमाणे ४५ हजार जणांच्या टीम तयार करतील.
हे सगळे जण एका अँपवर जोडले जातील आणि ते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतील. - बूथ प्रमुख पक्षासाठी कष्ट खूप करतो, पण लोकांना प्रभावित करणे,
त्यांना पक्षाकडे खेचून आणण्याबाबत तो कमी पडतो हे लक्षात आल्यानंतर आता ही वेगळी रचना करण्याचे ठरले आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी १५०० महिलांच्या उपस्थितीत १५ मेळावे घेण्यात येणार आहेत.
१५-३००-१५०-४५०० असा भाजपचा फॉर्म्युला असेल अशी माहिती आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा