Ban On Laser Lights-Laser Beam In Pune | पुणे: ‘लेझर बीम’चा वापर करण्यास पुढील ६० दिवस बंदी; दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा आदेश

Ban On Laser Beam Lights In Pune

पुणे : Ban On Laser Lights-Laser Beam In Pune | आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या (Pune Ganeshotsav) कार्यकर्त्यांची बैठक पोलीस आयुक्तालयात (Pune CP Office) आयोजित करण्यात आली होती. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेझर दिव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. लेझर दिव्यांमुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान या बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी विसर्जन मिरवणूकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

दहीहंडी उत्सव (Dahi Handi Ustav) हा मंगळवारी (दि.२७)आहे. दहीहंडीत विविध मंडळांकडून लेझर दिव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांनी लेझर दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश शनिवारी रात्री दिले. पुढील ६० दिवस शहरात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी राहणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून (Pune Police) सुधारित आदेश काढण्यात येणार आहेत.

लोहगाव परिसरात हवाई दलाचा तळ आहे (Lohegaon Pune Airport), तसेच नागरी विमानतळ आहे. लेझर दिव्यांमुळे वैमानिकांचे डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून नियमित आदेश काढण्यात येत असतात. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारपासून (दि.२४) पुढील साठ दिवस लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले. संबंधित आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश शर्मा यांनी दिले आहेत. (Ban On Laser Lights-Laser Beam In Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed